By  
on  

सायली संजीवच्या घरी आले Cute पाहुणे, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील गोड अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला येणारी सायली छोट्या पडद्यावर शुभमंगल ऑनलाईन या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सायली साकारत असलेल्या शर्वरी या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं. तसंच अलिकडेच प्रदर्शित झालेल्या झिम्मा या सुपरहिट मालिकेतही ती झळकली होती. 

गोड गोजि-या सायलीच्या घरी नुकतंच क्युट पाहुण्यांचं आगमन झालं आहे. तिने याची आनंदवार्ता सोशल मिडीयावरुन चाहत्यांना दिली. 

 

सायली संजीवने इंन्ट्रोड्यूज केलेल्या इन्स्टाग्रामवरील नवे पाहुणे म्हणजे क्युट अशी पप्पीजची गॅंग आहे.. घरी ही गॅंग आल्याने सायली संजीवला प्रचंड आनंद झाला आहे. सायलीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या गोड पिल्लांसोबत सायलीने छानसं फोटोशूटही केलंय. 

सायलीच्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive