By  
on  

ठरलं तर ! आयफोनवर चित्रित झालेला 'पॉंडिचेरी' या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

आयफोनवर चित्रित होणारा पहिलाच मराठी सिनेमा पॉंडिचेरीची रसिक प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच उलगडली आहे. प्रसिध्द दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. सई ताम्हणकर, वैभव तत्ववादी आणि अमृता खानविलकर हे लोकप्रिय कलाकार एकत्र स्क्रीन शेयर करतायत. 

सईने पॉंडिचेरी सिनेमाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर शेयर करत म्हटलंय, मी तुम्हा सर्वांना थिएटरर्समध्ये खुप मिस केलं आहे. एक खास सिनेमा जो संपूर्णरित्या आयफोनवर चित्रित केला आहे तो तुमच्यासमोर घेऊन येत आहोत. तेव्हा भेटूया, थिएटरमध्ये येत्या 28 फेब्रुवारीला. 

 

 

‘हॅप्पी जर्नी’, ‘गंध’, ‘वजनदार’ असे हटके सिनेमे देणा-या सचिन कुंडलकरांच्या या नव्या सिनेमाची प्रेक्षक आततुरतेने वाट पाहतायत.  

ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि महेश मांजरेकर यांच्यासुध्दा या सिनेमात महतत्वपूर्ण भूमिका आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive