By  
on  

धक धक गर्ल माधुरी दीक्षितच्या तालावर थिरकले मिस्टर नेने, पाहा Video

आपल्या नखशिखान्त सौंदर्याने आणि अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने आजही तितकीच चिरतरुण आहे. माधुरी आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे नेहमीच लाईमलाईटमध्ये असतात. एक मेड फॉर इच अदर असलेलं क्युट कपल म्हणून नेहमीच ते चर्चेत असतात.  

सतत आपल्या  चाहत्यांसोबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून संपर्कात असणा-या या प्रसिध्द बॉलिवूड कपलच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. यात श्रीराम नेने व माधुरी दीक्षित बद्रीनाथ की दुल्हनिया या सिनेमातील तम्मा तम्मा.. या गाण्यावर जबरदस्त थिरकताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर प्रसिध्द बॉलिवूड कोरिओग्राफर फराह खानने कमेंट् केली आहे. ती म्हणते, हॅपी बर्थ डे राम, तु माधुरीला खुप टफ कॉम्पिटिशन देतोयस. 

 

माधुरी आणि मिस्टर नेनेंच्या या जबरदस्त व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive