By  
on  

प्राजक्ता माळीचा मराठमोळा साजशृंगार , ऐतिहासिक 'पावनखिंड'मध्ये साकारतेय ही भूमिका

पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवित आहे. झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित पावनखिंड या चित्रपटाची मोठी उत्सुकता आहे. 

घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती. बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं 'पावनखिंड' नाव पडलं.

या सिनेमात अभिनेत्री प्राजक्ता माळी श्रीमंत भवानीबाई बांदल यांच्या भूमिकेत झळकतेय. 

या सिनेमातील प्राजक्ताचा हा मराठमोळ्या साजातील लुक तिने चाहत्यांशी सोशल मिडीयाद्वारे शेयर केला. 

 

प्राजक्ता लिहते, पारंपारिक मराठमोळा साजशृंगार करणं मला किती आवडतं, तुम्हाला काय सांगू..
तो मराठी थाट मोठ्या पडद्यावर दाखवता यावा, आपण एखादा ऐतिहासिक चित्रपट करावा अशी खूप दिवसांची इच्छा होती. “पावनखिंड” च्या निमित्ताने ती पूर्ण झाली.
.“श्रीमंत भवानीबाई बांदल” ह्यांची व्यक्तीरेखा साकारण्याच्या निमित्ताने दिग्पाल दादाने आयोजिलेल्या “श्री शिवराजअष्टक” चा भाग होता आलं; याचाही आत्यंतिक आनंद.  

 

शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'पावनखिंड' चित्रपटात अतिशय प्रभावीपणे मांडली आहे. शिवराज अष्टका'तील 'पावनखिंड' हे तिसरं पुष्प आहे. या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पहायला मिळणार असून मराठीतील आघाडीच्या कलाकारांचा भलामोठा फौजफाटा या चित्रपटात पहायला मिळणार आहे 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive