By  
on  

तब्बल 36 वर्षांनंतर प्रशांत दामले आणि वर्षा उसगावकर रंगभूमीवर एकत्र!

प्रसिध्द अभिनेते प्रशांत दामले हे नेहमीच प्रेक्षकांसाठी काही ना काही नवीन घेऊन येतात. सध्या छोटेया पडद्यावर त्यांचा किचन कल्लाकार हा शो खुप गाजतोय. अनेक सेलिब्रिटींना ते स्वयंपाकाला लावतात हे पाहून प्रेक्षक खुपच एन्जॉय करतायत. आत्ता प्रशांत यांनी अभिनेता, निवेदक आणि दिग्दर्शक असलेल्या संकर्षण क-हाडेसह एक व्हिडीओ सोशल मिडीयावर शेयर केलाय. यात त्यांनी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल हटके पध्दतीने प्रेक्षकांना सांगितलं आहे. मुख्य म्हणजे प्रशांत दामलेंसोबत अभिनेत्री वर्षा उसगांवकर या आगामी नाटकांत झळकतायत. नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन संकर्षण क-हाडेने केलं आहे. 

प्रशांत यांनी  हा व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, '३६ वर्षांनंतर पुन्हा एकदा मी आणि वर्षा रंगमंचावर! सादर आहे आमचं नवीन नाटक, 'सारखं काहीतरी होतंय' लवकरच रंगमंचावर. लेखन व दिग्दर्शन संकर्षण कऱ्हाडे. नाटकाच्या पुढील अपडेट साठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि पेज फॉलो करा.'

'सारखं काहीतरी होतंय' या नाटकाच्या निमित्ताने ३६ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर वर्षा उसगांवकर- प्रशांत दामले ही जोडी पुन्हा एकदा रंगमंचावर एकत्र दिसणार आहेत. प्रेक्षक या जोडीला एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दामले यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओवर युझर्सने भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, 'वा मस्तच उत्सुकता ताणली गेली, लवकर होऊ दे शुभारंभ.'

मराठीतील सुप्रसिध्द अभिनेता स्वप्निल जोशीनेसुध्दा या पोस्टवर कमेंट करत म्हटलंय. वा..वा.. मस्तच येऊ दे...संपूर्ण टीमला मनापासून शुभेच्छा असं म्हटलंय. 

 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive