By  
on  

अभिनेते-खासदार अमोल कोल्हे यांची बैलगाड्या पुढे घोडेस्वारी,पाहा Video

अभिनेते आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे सोशल मिडीयावर बरेच सक्रीय असतात. नुकतंच अमोल कोल्हे यांनी आपल्या सोसळ मिडीयावरुन एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक चाहते अमोल कोल्हे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करतायत, सर्वोच्च न्यायालयाने अटी आणि शर्थींसह बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर मावळमधील नाणोली, आंबेगाव येथील लांडेवाडी येथे बैलगाडा शर्यती पार पडत आहेत. आज डमधील दावडी लिंबगाव येथे मानाच्या खंडोबा घाटात बैलगाडा शर्यत पार पडली. या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे यांनी बैलगाड्या पुढे घोडेस्वारी केली.

काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे बैलगाडी पुढे घोडेस्वारी करणार का? असा प्रश्न शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी विचारत टोला लगावला होता. त्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून अमोल कोल्हे यांनी दिलेला आपला शब्द पाळला आहे. 

बैलगाडा मालकांना अमोल कोल्हे यांनी शब्द दिला होता, .ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल. त्या दिवशी हा तुमचा पठ्ठ्या पहिल्या बारी पुढे घोडी धरणार म्हणजे धरणार हा शब्द देतो.” 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe)

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive