By  
on  

'मला माहित नाही, मला जमत नाही', सिध्दार्थ चांदेकरची लक्षवेधी पोस्ट

मराठी सिनेमातील हॅण्डसम हंक अभिनेता सिध्दार्थ चांदेकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. पत्नी मिताली मयेकरसोबतचे रोमॅंण्टिक फोटो असो किंवा मग जंगल सफारीचे किंवा मग आपल्या आगामाी प्रोजेक्टसंदर्भातले फोटोज् व्हिडीओ तो आपल्या इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांपर्यंत पोहचवतो. पण सिध्दार्तच्या एका  पोस्टने मात्र चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

सिध्दार्थ पोस्टमध्ये लिहतो, "मला नाही माहित, मला नाही येत. मला नाही जमत. हे म्हणायला किती धाडस लागतं. मी कुणीतरी आहे इतरांना सांगण्याच्या अट्टाहासात मी आहे हे स्वत:ला कधी सांगणार ",  मी मीच आहे, असं कॅप्शन सिध्दार्थने दिलं आहे. 

सिध्दार्थच्या या वैचारीक पोस्टची बरीच चर्चा रंगली असून अनेक नेटक-यांनी त्याच्या या विचारांचं कौतुक केलं आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive