By  
on  

Video: 'कच्चा बदाम'वर ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर यांचा भन्नाट डान्स व्हायरल

सोशल मिडीयावर कधी कुठली गोष्ट ट्रेंडमध्ये येईल आणि त्याचा नाद लागेल याचा काही नेम नसतो. आजकाल या इन्स्टाग्राम रीलचं लहान-मोठ्या सर्वांनाच जबरदस्त वेड लागलंय. एखादं गाणं व्हायरल होत ट्रेंड सेट करतं आणि मग सगळेच त्यावर ताल धरतात. महत्वाचं म्हणजे मालिका सिनेमांच्या सेटवरचे कलाकार ब्रेकमध्ये एकत्र येत असे धम्माल रील्स बनवतात. मराठी सिनेसृष्टीतील असीच एक प्रसिध्द एव्हरग्रीन जोडी ऐश्वर्या नारकर व अविनाश नारकर यांनासुध्दा इन्स्टाग्राम रील्सचा मोह आवरता आलेला नाहीय. 

सध्या इंटरनेटवर ‘कच्चा बादाम’ हे बंगाली गाणे धुमाकूळ घालत आहे. इंस्टाग्राम उघडताच आपल्याला याचा प्रत्यय नक्कीच येईल. या गाण्यावर अनेक रील्स बनत असून सेलिब्रिटीजनाही या गाण्याने भुरळ घातली आहे. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. यात त्यांच्यासोत अभिनेत्री अश्विनी कासारनेसुध्दा ताल धरलाय.  त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive