By  
on  

या प्रसिध्द मराठी गायिकेच्या जीवाला आहे धोका, सोशल मिडीया पोस्ट करत दिली माहिती

मराठी सारेगमप विजेती आणि बिग बॉस मराठीच्या २ -या सीझनची स्पर्धक सुप्रसिध्द गायिका वैशाली सामंत हिला जीवे मारण्याची धमकी आली आहे. खुद्द वाशालीनेच फेसबुक पोस्टच्या माध्यमातून हा खळबळजनक खुलासा केला आहे. 

पण अचानक असं काय झालं की वैशालीच्या हत्येचा कट रचला जात आहे हा प्रश्न अनेकांना पडला आहे. स्वतः वैशालीने दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन या गोष्टी सांगणार असल्याचं स्पष्ट केलं.

सोशल मिडीयावर कमेंट्स मधून तिचे चाहते आणि हितचिंतक तिला स्वताची काळजी घेण्यास सांगतायत. 

वैशालीच्या सुरेल स्वरांनी रसिक प्रेक्षकांची नेहमीच मनं जिंकली आहेत. मराठीप्रमाणेच वैशालीने या शोचीदेखील ती विजेती ठरली. हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला. तसंच वैशाली 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. वैशालीच्या गायनाचे असंख्य चाहते आहेत. 

 

राजकारणात घेतलीय एन्ट्री 

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वैशालीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैशालीचे स्वागत केले होते.वैशालीच्या प्रवेशाचा कार्यक्रम पक्षाच्या मुंबई येथील मुख्यालयात झाला होता. वैशालीला विदर्भाचं विभागीय अध्यक्षपद म्हणून नेमण्यात आलं आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive