By  
on  

अप्सरा सोनाली कुलकर्णीने छत्रपती शिवरायांना दिली मानवंदना

आज 19 फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रात शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा होतोय. शिवजयंतीनिमित्त प्रत्येक जण महाराजांबद्दलचं प्रेम, श्रध्दा, ्भिमान असं सर्वकाही व्यक्त करताना दिसतोय. सोशल मिडीयावरही अनेक सेलिब्रिटी छत्रपती शिवाजी महाराजांना मनावंदना देत आहेत. 

सोशल मिडीयाच्या माध्यमातून महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिने छत्रपती शिवरायांना मनवंदना दिली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेयर केला आहे. यात पारंपारिक साजात सजलेल्या सोनालीच्या मागे छत्रपती शिवरायांची एक सुरेख मूर्ती पाहायला मिळतेय. 

शिवजयंतीनिमित्ताने महाराजांना वंदन करताना सोनाली लिहते, " महाराजांबद्दलचे प्रेम, कौतुक, आदर, श्रद्धा, अभिमान, आपुलकी,
हे सगळेच भाव @saneshashank ने अचूक टिपले या डोळ्यांमध्ये म्हाणून हा फोटो आज, इथे share करत आहे…कारण श्री छत्रपतींविषयी
या सगळ्याच भावना आपण सगळेच share करतो ना"

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive