By  
on  

Trailer Out :अंकुश-प्राजक्ता म्हणतायेत ''लकडाऊन बी पॉझिटीव्ह'

गेल्या अनेक दिवसापासून सध्या महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे ती म्हणजे 'लकडाऊन बी पॉझिटिव्ह' या चित्रपटाची, पहिल्या पोस्टर पासून ते नुकताच आलेल्या टिझरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होत. महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी हे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत असून या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.  येत्या २५ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभरात हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केले असून निर्मिती इष्णव मीडियाची आहे.

 लॉकडाऊनच्या काळात अनेक गोष्टी घडल्या आणि त्याचे परिणाम ही आपण पाहिले आहेत. या लॉकडाऊनच्या काळात अनेकांची लग्न रखडली आणि अनेकांची झाली पण ते सगळेच जिथे होते तिथे अडकले तर अशाच एका लग्नाची गोष्ट 'लकडाऊन' सांगत आहे. लॉकडाऊनच्या मध्ये एका लग्न घरात नेमकं काय काय घडलं असेल याच चित्रण या चित्रपटात आहे. हा चित्रपट वासू आणि सपना यांच्या कौटुंबिक प्रेमाची गोष्ट आहे हे ट्रेलर मध्ये दिसत आहे. वासू आणि सपनाच्या प्रेम कहाणीत येणारे ट्विस्ट हे गमतीदार आणि हसून लोटपोट करणार असल्याची ग्वाही हा ट्रेलर देतो. या चित्रपटात तब्ब्ल १५ नावाजलेले चेहरे एकत्र दिसणार असून यात संजय मोने, प्रिया बेर्डे हे बऱ्याच कालावधी नंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. मनोरंजन सृष्टीचा सुवर्णकाळ जगलेल्या 'शुभा खोटे' यांची या चित्रपटात मुख्य भूमिका असून वयाच्या ८४व्या वर्षी सुद्धा त्यांच्या अभिनयाची जादू कायम आहे.

या चित्रपटाची गाणी ही सध्या ट्रेंड होत असून, बेधुंद मी हे व्हॅलेंटाईन वीकच्या निमित्ताने प्रदर्शित झालेलं गाणं हे तरुणाच्या सोशल मीडियावर अकाउंटवर सातत्याने दिसत होत. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार,अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची आहे. केतन महांबरे आणि रवी थोपटे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर चित्रपटाच छायाचित्रण दिग्दर्शन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मितीची धुरा स्मिता खरात यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. या चित्रपटाला संगीत अविनाश - विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive