By  
on  

पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. ... प्रशांत दामलेंची पोस्ट चर्चेत

मराठी रंगभूमी, सिनेमा आणि टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेते प्रशांत दामले हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल किंवा सद्यस्थितीवर ते अनेकदा भाष्य करताना पाहायला मिळतात. 

नुकतंच प्रशांत दामले यांनी त्यांची व्यथा मांडणारी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या ही पोस्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

प्रशांत दामले हे अनेकदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. नुकतंच प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

“माझी व्यथा…., नाटक संपल्यानंतर तुमच्या बरोबर फोटो काढणं, तुमच्या बरोबर गप्पा मारण, तुमच्या सूचना ऐकणं हे सगळंच मी मिस करतोय. पण आपण रिस्क घेऊ शकत नाही. हा कोरोना आणि ही बंधन कधी संपत्यात अस झालय.. सगळं पूर्ववत होऊदे बाबा लवकर”, अशी पोस्ट प्रशांत दामले यांनी शेअर केली आहे. प्रशांत दामले यांनी शेअर केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. ती पोस्ट सध्या नेटक-यांमध्ये व रसिक प्रेक्षकांमध्ये व्हायरल होताना दिसत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive