By  
on  

“साडीतून दिसणाऱ्या या कमनीय बांध्याच्या…”, मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर नुकतीच आई झाली. ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते.  सोशल मीडियावर पोस्ट करत तिने ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली होती.  नुकतीच उर्मिलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत बाळाला जन्म दिल्यानंतर एका स्त्रीला काय त्रास होतो त्याविषयी सांगितले आहे.

उर्मिलाने तिचे साडीतले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये उर्मिलाने पिवळ्या रंगाची साडी नेसली आहे. उर्मिलाने पाठून काढलेला तिचा हे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “साडीतून दिसणाऱ्या या कमनीय बांध्याच्या पुढच्या बाजूला फक्त ६ महिन्यांपूर्वी पडलेले टाके आजही थंडीत ओढले जातात. समाजमान्य नाजुक बांध्याच्या व्याख्येत न बसणारा हा बांधा, नुसता आर्थिक दृष्ट्या सबळ नाही, तर गेले १५ महिने झाले एका जीवाचं वजन उचलतोय…कधी अलगद तर कधी वेदनेत”, असे कॅप्शन उर्मिलाने दिले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive