By  
on  

“मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला…”, मुंबई महापालिकेला टॅग करत सुमित राघवनने व्यक्त केला संताप

मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेता अशी ओळख असणारा सुममित राघवन हा सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतो. विविध विषयांवर तो व्यक्त होतो. या व्यासपीठाच्या माध्यमातून तो अनेक ज्वलंत आणि वास्तवदर्शी मुद्दे विषय प्रकाश झोतात आणतो, त्यांना वाचा फोडतो. तर कधी स्वत:ला आलेले अनुभव सांगतो.  नुकतंच मुंबई महानगरपालिकेला उद्देशून सुमितनं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मागच्या काही काळापासून मुंबईच्या द्रुतगती मार्गांवर अनधिकृत दुकानं किंवा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नाहक त्रास भोगावा लागतोय.  सुमितनं नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये याच प्रकाराकडे मुंबई महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या ट्विटरवर त्यानं पश्चिम द्रुतगती मार्गावरील एक व्हिडीओ शेअर करत एक पोस्टही लिहिली आहे. ज्यात त्यानं मुंबई महानगरपालिकेला टॅगही केलं आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive