By  
on  

गणेश शिंदेंच्या कारनाम्यानंतर आणखी एका मराठमोळ्या युट्यूबरच्या मर्सिडीझची चर्चा

सध्या सोशल मिडीया कंटेट क्रिएटर्सना स्टार्सपेक्षाही सेलिब्रिटी म्हणून जास्त प्रसिध्दी मिळते. इन्स्टाग्राम, युट्यूब, फेसबुकमुळे ते सामान्यांपासून ते अतिसामान्य माणसांची मनं जिंकतात. करोना काळात अनेक व्यवसाय बंद झाले, पण हातातील स्मार्टफोनचा वापर करत अनेकांनी कमाईचा मार्ग शोधला. बंद झालेली सिनेमागृहांमुळे प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाकडं वळला होता. युट्यूबर्सनी या संधीचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर चांगला आणि आशयघन कंटेट देण्यास सुरुवात केली यातून बराच पैसा उभा झाला. पत्र्यात खोलीत राहणाऱ्या या दांपत्यानं लॉकडाऊनच्या काळात यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून पैसे कमवण्याचा मार्ग शोधला. गणेश शिंदे आणि योगिता शिंदे या दाम्पत्याचे व्हिडीओ पाहणारा खुप मोठा वर्ग आहे. त्यांचे खुप मोठे चाहते आहेत, 

प्रतिूकूल परिस्थित जगणारे गणेश यांनी त्यांच्या पत्नीच्या बाळांतपणासाठी काही महिन्यांपूर्वी व्हिडिओद्वारे आर्थिक मदत मागितली होती. त्यांची एकंदर परिस्थिती पाहता, अनेकांनी त्यांना मदत केली. पण सध्या त्यांच्यावर खोटं बोलून आर्थिक मदत मागितल्याचा आरोप होतोय. हा आरोप करण्याचं कारण म्हणजे, काही महिन्यांत त्यांनी एक छान घर बांधलं, मुलीचं बारसं देखी थाटामाटात केलं. आता तर त्यांनी चार चाकी गाडी खरेदी केलीए. त्यामुळं ज्यांच्याकडे बायकोच्या डिलिव्हरीसाठी पैसे नव्हते, त्यांनी काही महिन्यात गाडी कशी घेतली, असा सवाल नेटक-यांनी उपस्थित केलाय. 

दरम्यान हा वद सुरु असतानाच आणखी एका मराठमोळ्या युट्यूबरनं मर्सिडीज घेतली  आहे आगरी कोळी भाषेत धम्माल व्हिडिओ बनवत प्रेक्षकांना हसवणारा युटयूबर विनायक माळी यानं काही दिवसांपूर्वीच मर्सिडीज कार खरेदी केली आहे. आगरी कोळी किंग विनायक माळीचे धम्माल व्हिडीओज् तुफान हिट् होतात.

 

त्यामुळं पुन्हा एकदा मराठी युट्यूबर्सची चर्चा जोरात सुरू आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive