By  
on  

“तुमचं एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो…”, ‘ती परत आलीये’च्या कलाकाराची पोस्ट चर्चेत

आपण म्हणतो की आजची पिढी ही मोबाईल फोन आणि सोशल मिडीयाच्या जगात अक्षरश: वाहून गेलीय. पण ज्या प्रकारची टीका आपण सोशल मिडीयावर करतो. तसे ्तयाचे अनेक फायदेसुध्दा आहेत. याच सोशल  मिडीयाच्या माध्यमातून अनेक चांगली कामं केलेली पाहायला मिळतायत.छोट्या पडद्यावरच्या  ती परत आलीये.’ या मालिकेने अगदी पहिल्या भागापासून प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले आहे. याच मालिकेतून घराघरात पोहोचलेले लोखंडे फेम अभिनेते देवेंद्र सरदार यांना ओळखले जाते.लोखंडे या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका त्यांनी साकारली होती. सध्या देवेंद्र हे ‘छुमंतर’ या विनोदी नाटकात काम करत आहे. या नाटकाच्या निमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

 

छुमंतर या मराठी नाटकात काम करणाऱ्या देवेंद्र सरदार यांनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. देवेंद्र सरदार यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. “काल चौकच्या छुमंतर नाटकाच्या नाट्यप्रयोगातून स्वराली आणि स्वरांजली या दोन बहिणीच्या शस्त्रक्रियेसाठी केलेल्या पहिल्या प्रयोगातून ८१,७०० रोख रक्कम त्यांच्या पालकांकडे प्रेक्षकांसमोर सुपूर्द केली. अजून ९ प्रयोग छूमंतर टीम यांच्या मदतीसाठी करणार आहे. त्याचा पुढचा प्रयोग कर्जत येथे ६ मार्चला रॉयल गार्डनला आहे. नक्की या… तुमचं एक तिकीट कोणाचा तरी श्वास बनू शकतो”, असे त्यांनी यात म्हटले आहे. देवेंद्र यांची ही इन्स्टाग्राम पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive