By  
on  

प्रेक्षकहो तुम्ही 'पावनखिंड' साजरा करताय. आम्ही धन्य झालो! चिन्मय मांडलेकरची पोस्ट चर्चेत

दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित ऐतिहासिक सिनेमाला सिनेमागृहात प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. 18 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेतोय. रसिकांच्या पसंतीस उतरतोय. सिनेमाचं हे यश पाहून सिनेमाची संपूर्ण टीम भारावून गेलीय. 

 या सगळ्यात अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपट OTT प्रदर्शित न करता चित्रपटगृहात का प्रदर्शित केला त्याचे कारण सांगितले आहे.

या चित्रपटात चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ‘पावनखिंड’ चित्रपटगृहात पाहायला आलेल्या प्रेक्षकांचा व्हिडीओ शेअर करत चिन्मय म्हणाला, “गेल्या दोन वर्षात अनेकांनी विचारलं ‘पावनखिंड’ OTT वर का प्रदर्शित करत नाही? हे आहे त्याचं उत्तर. स्वास्थ्यासाठी सामाजिक अंतर राखायलाच हवं. पण सामाजिक स्वास्थ्यासाठी लोकांनी एकत्र येऊन काहीतरी साजरं ही करायला हवं. प्रेक्षकहो तुम्ही ‘पावनखिंड’ साजरा करताय. आम्ही धन्य झालो!” चिन्मयची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive