By  
on  

आमिरनंतर धनुषने केलं नागराज मंजुळेंच्या 'झुंडं'चं कौतुक, पाहा Video

सध्या सैराट दिग्दर्शक नागराज मंंजुळे यांच्या अमिताभ बच्चन स्टारर झुंड या बॉलिवूडपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या 4 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वीच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या सिनेमाचं प्रायव्हेट स्क्रिनींग नुकतंच पार पडल आणि हा सिनेमा पाहून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुध्दाभारावून गेला. त्याला अश्रू अनावर झाले होते. आता आमिरनंतर दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने हा चित्रपट पाहिला आहे. आता त्यावर धनुषने या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

धनुषचा हा व्हिडीओ नागराज मंजुळेने फेसबुकवर शेयर केला आहे. या व्हिडीओत धनुष बोलतो, “कुठून सुरुवात करू ते समजत नाही. अप्रतिम चित्रपट बनवला आहे. नागराज मंजुळे यांचा आवाज चित्रपटातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला पाहिजेच, दुर्लक्ष करता येणार नाही असं त्याचं काम आहे. या चित्रपटातील तांत्रिक गोष्टींविषयी मी खूप काही बोलू शकतो, अप्रतिम आहे. पण अखेरीस या चित्रपटातील भावना तुमचं मन जिंकून जातात. हा अनुभव सर्वांनी घेण्यासारखा आहे. या चित्रपट पाहिल्यानंतर त्यात असलेली जादू मला खूप आनंद आहे. या चित्रपटातील मुलांनी माझं मन जिंकलं आहे. मी नि:शब्द झालोय. अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे,” असं धनुष म्हणाला.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive