By  
on  

मराठी भाषादिनाच्या पोस्टवरून किरण मानेंनी उडवली सोनाली कुलकर्णीची खिल्ली

27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन साजरा झाला. सर्वत्र मराठी भाषादिनाचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनंही तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यावरून अभिनेता किरण माने यांनी तिला ट्रोल केलं आहे.

अभिनेता किरण माने काही दिवसांपूर्वी ‘मुलगी झाली हो’ मालिकेच्या सेटवर झालेल्या वादामुळे बरेच चर्चेत होते. सोनालीनं मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देताना लिहिलं, ‘न आणि ण.. श आणि ष…ळ आणि ड, चांदणी मधील च आणि चंद्रामधील च, जहाजमधील ज आणि जीवनामधील ज यांच्या उच्चारातील फरक कळणाऱ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! बाकीच्यांना मराठी भाशा दिणाच्या मणापासून षुभेच्छा!!!’असा संदेश लिहला होता. 

सोनालीच्या पोस्टवर कमेंट करताना किरण माने यांनी लिहिलं, ‘उच्चार चुकवणाऱ्यांनी ‘डॅन्स’ची एक लाखाची सुपारी दिली की पारावर आणि ट्रालिवरबी नाचायचं… आणि इकडं येऊन त्यांची टर उडवायची हे बरे न्हवं. अस्सल सातारीत बोलनार या कायम न ला न म्हन्नार या आमच्या लाडक्या राज्यांच्या वाढदिवसाला परवा परवाच साताऱ्यात नाचून गेल्यात म्याडम…या नाट्यांना प्रमाण भाषेत बोलनारं कुत्रंबी ईचारत नाय. सगळं यश मिळवलंय ते ग्रामीन भूमिका करूनच. लिश्ट काढा हिट पिच्चरची.’

सोनाली कुलकर्णीला  मराठी भाषा दिनाच्या पोस्टमुळे ट्रोलींगचा सामना करावा लागल्याने तिने काही वेळातच ही पोस्ट सोशल मिडीयावरुन  काढून टाकली 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive