By  
on  

'काचा बादामवर' थिरकली राहुल देशपांडेची लेक रेणुका, पाहा हा क्युट व्हिडीओ

‘काचा बादाम’ हे गाणं सध्या सोशल मिडीयावर प्रचंड लोकप्रिय ठरतंय. यावरचे विविध रील्स व्हायरल होत आहेत. प्रसिद्ध शास्त्रिय गायक राहुल देशपांडे यांची कन्या रेणुका ही प्रचंड लोकप्रिय झाली आहे. सोशल मिडीयावर तर रेणुकाचे अनेक गोज  व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. राहुल देशपांडे हे रेणुकासोबतचे काही व्हिडीओ त्यांच्या सोशल मिडीया अकाउंटवर पोस्ट करत असतात. नुकताच त्यांनी‘काचा बादाम’वर थिरकताना  एक असाच व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

ट्रेंड फॉलो करतानाचा छोट्या रेणुकाचा हा क्युट  व्हिडीओ  पाहून तुम्हीही म्हणाल किती गोड. राहुल देशपांडे यांनी शेयर केलेल्या या व्हिडीओवर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

दरम्यान, राहुल देशपांडे यांची जिओ स्टुडिओज प्रस्तुत, मी वसंतराव ही संगीताची सुरेल मैफल गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर म्हणजेच १ एप्रिल पासून चित्रपटगृहात रंगणार आहे. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने जिओ स्टुडिओज प्रथमच पदार्पण करत आहे. चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर निर्मित या चित्रपटात राहुल देशपांडे यांनी स्वतः पंडित वसंतराव देशपांडे यांची व्यक्तिरेखा साकारली आहे. आणि महत्वाचं म्हणजे या चित्रपटाला संगीतही राहुल देशपांडे यांचेच लाभले आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटात अनिता दाते, पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive