By  
on  

“माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा…”, कुशल बद्रिकेची ही पोस्ट जरुर पाहा

चला हवा येऊ द्याची जोडी म्हणून कुशल बद्रिके आणि  भाऊ कदम संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. आपल्या धम्माल विनोदी अभिनयाने ते प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करतात. विविध गेटअप्स कॅरी करत चाहत्यांना मनमुराद हसवतात. प्रत्यक्ष आयुष्याल म्हणजेच रील लाफ व्यतिरिक्त रिअल लाईफमध्येही या जोडीची घनिष्ट मैत्री आहे. 

. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. नुकतंच कुशल बद्रिकेने एक पोस्ट शेअर केली आहे. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

भाऊ कदम यांचा काल ३ मार्च रोजी वाढदिवस होता. या निमित्ताने सेलिब्रिटींपासून चाहत्यांपर्यंत अनेकांनी भाऊ कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. “माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा घेणारा एकमेव माणूस म्हणजे “भाऊ कदम”, प्रेयसी कशी आपली झोप उडवते, तशीच माझी झोप उडवणार्‍या माझ्या मित्रा, तुला वाढदिवसाच्या घन”घोर” शुभेच्छा”, असे कुशल बद्रिकेने म्हटले आहे.

 

कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या या व्हिडीओत तो भाऊ कदम यांच्या बाजूला झोपलेला दिसत आहे. यावेळी भाऊ कदम हे जोरजोरात घोरत असल्याचे पाहायला मिळतेय आणि म्हणूनच कुशलची झोप उडालीय.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive