By  
on  

अभिनेता सुबोध भावेने नागराज मंजुळेंसाठी केली खास पोस्ट, “नागराज तुझ्या आयुष्यातील…”

 सध्या सैराट दिग्दर्शक नागराज मंंजुळे यांच्या अमिताभ बच्चन स्टारर झुंड या बॉलिवूडपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या 4 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वीच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या सिनेमाचं प्रायव्हेट स्क्रिनींग नुकतंच पार पडल आणि हा सिनेमा पाहून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुध्दाभारावून गेला.यानंतर आता आपला मराठी सुपरस्टार सुबोध भावेनेसुध्दा नागराजचं मनापासून कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

सुबोध भावे म्हणतो, नागराज तुझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा उद्या तू गाठतोयस, आमच्या पिढीचा तू एक महत्त्वाचा दिग्दर्शक आहेस आणि तुझ्या प्रत्येक चित्रपटाची उत्सुकता नेहमीच असते. ४ मार्च रोजी प्रदर्शित होणाऱ्या “झुंड” या तुझ्या पहिल्या हिंदी चित्रपटासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा”, असे कॅप्शन सुबोध भावेंनी दिले आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive