By  
on  

"अमिताभ बोलतो का रे सेटवर ?" "समोरच्याला घाबरवत असेल ना तो ?", किशोर कदम यांनी सांगितला बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव

 सध्या सैराट दिग्दर्शक नागराज मंंजुळे यांच्या अमिताभ बच्चन स्टारर झुंड या बॉलिवूडपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. येत्या 4 मार्च रोजी हा सिनेमा प्रदर्शित होतोय. पण तत्पूर्वीच या सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या सिनेमाचं प्रायव्हेट स्क्रिनींग नुकतंच पार पडल आणि हा सिनेमा पाहून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसुध्दाभारावून गेला.

बिग बी अमिताभ बच्चन यांची झुंड सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत. यात निवृत्त खेळ प्रशिक्षकाच्या भूमिकेत त्यांना पाहायला मिळतंय. त्यांच्या अभिनयाबद्दल आपण काय लिहू शकतो. त्यांना या शतकाचं महानायक म्हणतात, ते उगीच नव्हे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड या बॉलिवूडपटात अनेक मराठमोळे कलाकार लक्षवेधी भूमिकेत आहेत. त्यापैकीच प्रसिध्द अभिनेते किशोर कदम एक व्यक्तिरेखा या सिनेमात साकारतायत. बिग बींसोबत काम करण्याचा अनुभव त्यांनी नुकताच फेसबुकच्या माध्यमातून मांडला आहे. किशोर कदम यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे. 

किशोर कदम यांनी त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यात किशोर कदम यांनी ३ फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत “यातल्या तिसऱ्या फोटो फ्रेममध्ये अमिताभ बच्चन ही एकच व्यक्ती तुम्हाला दिसत आहे. मला ही तिच व्यक्ती दिसत आहे. ही व्यक्ती माझ्या मनाच्या पडद्यावर कोरला गेलाय. आजवर मी त्याला दोनदा भेटलो आहे. पहिल्यांदा मी एका पुरस्कारात भेटलो होतो तेव्हा आणि आता नागराजच्या झुंडच्या सेटवर सतत दहा दिवस. तेव्हा ही मी एक फोटो काढला होता. त्यांच्यासोबत काम केल्यानंतर अमिताभ बोलतो का सेटवर? कॉम्पलेक्स येतो का रे त्याचा? समोरच्याला घाबरवत असेल ना तो? काय बोललास त्याच्या बरोबर? असे अनेक प्रश्न कुणी कुणी मला विचारत होत, त्यावेळी त्यांना काय उत्तर द्याव हे मला कळतं नाही”, असे किशोर कदम म्हणाले.

पुढे किशोद कदम म्हणाले, “जिथे त्या माणसासोबत एकाच फ्रेममध्ये असून मीच माझ्यासाठी इनव्हीजिबल होतो त्या माणसाबद्दल असल्या प्रश्नांना उत्तरं देत बसण्यात अर्थ नाही असं मला वाटतयं. नागराजमुळे मला या महान व्यक्तीसोबत काम करता आलं हे नागराजचे माझ्यावर असलेले उपकार आहेत. काल झुंड पाहिला आणि ही व्यक्ती किती ग्रेट अभिनेता आहे हे मला पुन्हा एकदा कळलं. आपलं सगळं स्टारडम, अँग्री मॅनची प्रतिमा आणि लोकांनी दिलेलं देवत्व विसरून एका साध्या फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका ज्या ग्रेसफुली या माणसाने साकारली त्याला शब्द नाहीत. नागराजसारख्या तीनेक चित्रपटांचा अनुभव असलेल्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा निर्णय या माणसाने घेतला.” याचाच अर्थ नागराजमधलेलं असलेलं टॅलेन्टं अशा व्यक्तीला कळत ज्याला वर्षानुवर्षाचा अनुभव आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive