By  
on  

बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकमचा कारनामा, पाहा Video

बिग बॉस मराठीचा यंदाचा तिसरा सीझन प्रचंड गाजला. अनेक कारणांनी हा सीझन चर्चेत होता. अटीतटीच्या फिनालेमधून अभिनेता विशाल निकम याने बिग बॉस मराठी ३ ची ट्रॉफी आपल्या नावावर केली. या शोमुळे सर्वांच्या मदतीस तत्पर असणारा मनमिळाऊ आणि दयाळू विशालच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ झाली. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या विशालबदद्ल जाणून घेण्याची चाहत्यांना कायम उत्सुकता असते. 

विशालने नुकताच एक मोठा कारनामा केला आहे, म्हणजेच विशालने नवी कोरी गाडी विकत घेतलीय. या गाडीला घरी आणण्याचा एक सुंदर व्हिडीओ विशालने  आपल्या सोशल मिडीयावरुन शेयर केला आहे. विशालच्या या कारनाम्याबद्दल त्याच्यावर सेलिब्रिटी मित्र व चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

 

 

विशाल निकमने नुकतंच टाटा हॅरियर ही कार खरेदी केली आहे. ही गाडी खरेदी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. विशालसोबत त्याचे बाबादेखील दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विशालच्या चेहऱ्यावरील आनंद झळकतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive