By  
on  

Video : आर्ची- परश्यानं ‘सैराट’चा तो सीन केला रिक्रिएट, सहा वर्षानंतरही या जोडीची जादू कायम

लोकप्रिय  दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ चित्रपट सध्या बराच गाजतोय. सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. अमिताभ बच्चन यांची या मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या बॉलिवूडपटातील मुख्य भूमिका हे याचं खरं कारण. पण सिनेमात अनेक मराठी कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका आहेत.  अशीच चर्चा ६ वर्षांपूर्वी ‘सैराट’ चित्रपटाची झाली होती. रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर या जोडीने रसिक प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ या बॉलिवूडपटातही ही जोडी महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. 

सैराट सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आणि एक नवीन इतिहास रचला. मराठी सिनेमासुध्दा 100 कोटी क्लबमध्ये जाऊ शकतो हे सैराटने सिध्द करुन दाखवलं. सैराटबद्दल काय बोलणार मराठीच नाही तर संपूर्ण बॉलिवूडसुध्दा झिंगाट झालं. सैराटने यशाचे अनेक विक्रम केले. म्हणूनच तर बॉलिवूडकरांनासुध्दा त्याचा हिंदी रिमेक करण्याचा मोह आवरता आला नाही. 

सैराट चित्रपटात एक सीन आहे ज्याची प्रेक्षकांमध्ये बरीच क्रेझ पाहायला मिळाली होती. यामध्ये आर्ची खेळत असताना परश्या तिला एकटक बघत असतो आणि हे जेव्हा तिच्या लक्षात येत तेव्हा ती बेधडकपणे त्याला, ‘तू का माझ्याकडे बघतोस?’ असं विचारते. त्यावर परश्या ‘तू का माझ्याकडं बघतेस?’ असं म्हणतो. मग गप्प राहिल ती आर्ची कसली. ती देखील त्याला म्हणते, ‘मी बघीन नाहीतर कायपण करेन’ यावर परश्या देखील तिला, ‘मग मी पण बघीन नाहीतर कायपण करेन. तुला नसेल आवडत तर नको बघू की’ असं प्रतिउत्तर देतो आणि मग आर्ची पण त्याला, ‘मी कुठं म्हणलं मला नाही आवडत’ असं म्हणते. हाच सीन रिंकू आणि आकाशनं ‘झुंड’च्या प्रमोशन कार्यक्रमात रिक्रिएट केला.

 

 

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. आज ६ वर्षांनंतरही या दोघांची लोकप्रियता तसूभरही   कमी झालेली नाही.  सैराटमधली दोघांची केमिस्ट्री खुपच भन्नाट होती. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकत्र पाहायला चाहत्यांना नक्की आवडेल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive