By  
on  

“जात.. जात नाही तोवर” केदार शिंदे यांचं 'झुंड'विषयीचं ट्विट चर्चेत

मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सिनेमा झुंड नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींनी करोनाच्या महामरी काळा'तर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. बडी फिल्म बडे पर्देपर या सिनेमाच्या टॅगलाईनप्रमाणेच हा सिनेमा सर्वार्थाने सिध्द होतोय. आमिर खान, धनुष, यासारख्या सुपरस्टार्सनंतर मराठी कलाकारांकडून झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक मराठमोळे सेलिब्रिटीसुध्दा सोसल मिडीयावर झुंड सिनेमाविषयी व्यक्त होत आहेत. प्रसिध्द मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी झुंडविषयी केलेलं एक ट्विट सध्या बरंच चर्चेत आहे. 

हे ट्वीट करत केदार शिंदे म्हणाले, “जात.. जात नाही तोवर माणूस म्हणवून घ्यायची आपली लायकी नाही. म्हणून ‘झुंड’ हा चित्रपट पाहा.” केदार शिंदे यांच्या या ट्विटची खुप चर्चा रंगलीय. 

 

दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात विजय बारसेंच्या भूमिकेत अमिताभ बच्चन यांना पाहायला मिळतंय. तर रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे, किशोर कदम, छाया कदम आदी मराठमोळे कलाकारसुध्दा या बॉलिवूडपटात झळकतायत.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive