By  
on  

माणसाच्या माणूसकीचा प्रवास... झुंड पाहिल्यावर सिध्दार्थ जाधवची खास पोस्ट चर्चेत

आपले मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सिनेमा झुंड नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींनी करोनाच्या महामरी काळानंतर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. बडी फिल्म बडे पर्देपर या सिनेमाच्या टॅगलाईनप्रमाणेच हा सिनेमा सर्वार्थाने सिध्द होतोय. आमिर खान, धनुष, यासारख्या सुपरस्टार्सनंतर मराठी कलाकारांकडून झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. 
मराठीतला एनर्जी मॅन म्हणून ओळखला जाणारा आपला सिध्दू म्हणजेच सिध्दार्थ जाधवनेसुध्दा झुंड पाहिल्यावर एक कौतुकाची पोस्ट शेयर केली आहे. सिध्दार्थ म्हणतो. “तुम्ही आमचं अस्तित्व नाकारूच शकत नाही…नागराज मंजुळे भावा… अप्रतिम हा शब्द फक्त नावाला आहे.. त्याचा खरा अर्थ समजून घ्यायचा असेल तर “झुंड” पाहायलाच हवा…स्वप्न प्रत्येकाची असतात.. पण ती पूर्ण करण्याची धमक ‘झुंड’मध्ये होती, आहे आणि कायम राहणार.. हे तू पुन्हा एकदा सिद्ध केलस… अभिमान वाटतो तुझा… “अपून की बस्ती गटर मे है… पर तुम्हारे मन मे गंद है”….या ओळी मनातून जातच नाहीत… अजय अतुल दादा… माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि ते कायमच राहिल. कलाकारांच्या कामाबद्दल मी काय बोलणार…”

“”बच्चों से लेकर बच्चन तक”…. सगळेच वरचा क्लास…जे जगणं आहे तेच नागराजने खरंखरं मांडलय….माणसाच्या माणुसकीचा प्रवास… झुंड… नक्की बघा नाही.. पहायलाच हवा..”. 
सिध्दार्थ जाधवची ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे.

 

 
दरम्यान, ‘झुंड’ हा चित्रपट स्लमसॉकरचे संस्थापक विजय बरसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात विजय बारसेंच्या भूमिकेत अमिताभ बच्चन यांना पाहायला मिळतंय. तर रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे, किशोर कदम, छाया कदम आदी मराठमोळे कलाकारसुध्दा या बॉलिवूडपटात झळकतायत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive