By  
on  

ऐश्वर्या नारकर यांचा श्रीवल्ली लुकमधला व्हिडीओ होतोय व्हायरल

मराठी मालिका असो सिनेमे किंवा मग  नाटक अशी अभिनयाची मुशाफिरी करणा-या प्रतिभावान व सौंदर्याचं ऐश्वर्य लाभलेल्या अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. आपण मालिकांमधून विविध व्यक्तिरेखांमधून त्यांना पाहिलंय. मात्र त्या ख-या आयुष्यात कशा मस्त बेधुंद जगतात हे त्यांच्या काही लेटेस्ट फोटो आणि व्हिडीओंवरुन पाहायला मिळतं. हल्ली ऐश्वर्या नारकर या सोशल मिडीयावरचा प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्यात अग्रेसर असतात.  तरुणींनासुध्दा लाजवेल असा त्यांचा उत्साह असतो. 

सोशल मिडीयावर ऐश्वर्या यांनी श्रीवल्ली या पुष्पा सिनेमातल्या सुपरहिट सिनेमातील नायिकेप्रमाणे गेटअप करत त्या गाण्यावर जबरदस्त व्हिडीओ शेयर केला आहे. त्यांचा हा गोड व्हिडीओ पाहून तुम्हीही प्रेमात पडाल एवढं नक्की. 

पडद्यावर लाडकी आई-सासूबाईंच्या व्यक्तिरेखा साकारणा-या ऐश्वर्या यांचे ख-या आयुष्यातले रील व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive