By  
on  

‘झुंड’च्या प्रिमिअरसाठी रिंकूचा साडी लुक, तिच्या अदांनी लावलं चाहत्यांना याड

दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बॉलिवूड  सिनेमा झुंड नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.या सिनेमाच्या महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहेत. बडी फिल्म बडे पर्देपर या सिनेमाच्या टॅगलाईनप्रमाणेच हा सिनेमा सर्वार्थाने सिध्द होतोय. आमिर खान, धनुष, यासारख्या सुपरस्टार्सनंतर मराठी कलाकारांकडून झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय.


या सिनेमात रिंकू राजगुरु, आकाश ठोसर, सोमनाथ अवघडे, किशोर कदम, छाया कदम आदी मराठमोळे कलाकारसुध्दा या बॉलिवूडपटात झळकतायत. 


सैराटमुळे तमाम महाराष्ट्राची लाडकी आर्ची बनलेली अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. 

झुंडच्या प्रिमीयरसाठी तिने खास लाल आणि नारंगी रंगाची साडी नेसली होती, 

या खास साडीत रिंकूचा घायाळ करणारा अंदाज पाहायला मिळाला. 

रिंकूने हे साडीतले फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आणि चाहत्यांना याडचं लागलं. 

रिंकूच्या या लयभारी फोटोंवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव होतोय.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive