By  
on  

लतादीदींचे आर्शिर्वाद म्हणून हेमांगी कवीकडे आहे ही गोष्ट

6 फेब्रुवारी हा दिवस भारतवासियांसाठी अतिशय दुखद ठरलाय. या दिवशी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला.   वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली

मनोरंजन, संगीत विश्वासह संपूर्ण देशभरात शोककळा पसरली. लतादीदींच्या जाण्याने कधीही भरुन निघणारी पोकळी आपल्या देशात निर्माण झाली. 
लता मंगेशकर यांचे निधन होऊन आज एक महिना उलटला आहे. या निमित्ताने हेमांगी धुमाळ हिने एक पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी कवीने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक चाफ्याची फुले असलेला फोटो पोस्ट केला आहे. याला तिने हटके कॅप्शनही दिले आहे. “आज एक महिना झाला! भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पायावरील वाहिलेल्या या सोनचाफ्याला! त्यांचा आशीर्वाद म्हणून उचलून घेतलं आणि जपून ठेवलं! कायम जपणार! माझ्याकडे असलेली सर्वात महाग वस्तू!” असे हटके कॅप्शन तिने दिले आहे.

 

 

तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. तिच्या या पोस्टवर एका नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. ‘ठेवू नका. जाळा अथवा फेकून द्या. मृतात्म्यासंबंधित कोणतीच गोष्ट घरी आणू नये’, असे त्या नेटकऱ्याने म्हटले आहे. यावर कमेंट करताना हेमांगी कवी म्हणाली, ‘मी खरंच अश्या गोष्टी मानत नाही! म्हणून तुमचं म्हणणं थोतांड होत नाही. तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात मी माझ्या. आता हे आशीर्वाद म्हणून उचलून घेतलेलं फुल ही काही लोकांसाठी थोतांड होऊ शकतं. पण माझ्यासाठी ते अनमोल आहे.’

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive