By  
on  

महिलादिनी अरुंधती फेम मधुराणीचा महिलांसाठी खास संदेश, पाहा व्हिडीओ

 आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, स्त्रियांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम दर्शवितो. आज जगभर आंतरराष्ट्रीय मगहिलादिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. त्यानिमित्तानेसेलिब्रिटीसुध्दा सोसल मिडीयावर अनेक पोस्ट शेयर करतात. छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेची अरुंधती म्हणजेच सर्वांची लाडकी आई फेम अभिनेत्री मधुराणी गोखले हिने समस्त महिला वर्गासाठी एक छानसा संदेश दिला आहे. मधुराणीच्या या व्हिडीओची खुप चर्चा रंगलीय. 

मधुराणी सोशल मिडीयावर हा व्हिडीओ पोस्ट करत म्हणते, मैत्रिणींनो, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आज अरुंधती महाराष्ट्रातल्या असंख्य स्त्रियांसाठी, लेकींसाठी प्रेरणा स्थान झालेय. मला वेगवेगळ्या क्षेत्रातल्या, वेगवेगळ्या वयोगटातील अनेक स्त्रिया येऊन भेटतात तेव्हा त्या प्रत्येकीला गहिवरून आलेलं मी पाहते. प्रत्येकजण अरुंधतीच्या प्रवासात कुठेतरी स्वतः ला पाहत असते.
अरुंधती साकारताना, तिच्या ह्या प्रवासाने मला म्हणजे मधुराणी ला बरंच काही शिकवलंय....
आणि ह्याचं श्रेय जातं ह्या अरुंधतीला उभं करणाऱ्या आमच्या सशक्त आणि प्रगल्भ लेखिका नमिता वर्तक आणि मुग्धा गोडबोल. आणि ह्या अरुंधतीला दिशा देणारे आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर. ह्या तिघांनी अक्षरशः बोटाला धरून प्रत्येक वळणावर मला अरुंधतीपर्यंत पोहचवलंय ... ती ह्या तिघांची आहे . मी केवळ तिचं रूप आहे.

 

मधुराणीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून चाहते त्यावर कौतुकाचा वर्षाव करतायत.  

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive