By  
on  

'अजून आठवतं जेव्हा चोरुन ऑडिशनला जायचे...' मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

 आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक यशाचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, स्त्रियांबद्दल आदर, प्रशंसा आणि प्रेम दर्शवितो. आज जगभर आंतरराष्ट्रीय मगहिलादिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय. देवमाणूस आणि बिग बॉस मराठी ३ मुळे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलेली अभिनेत्री सोनाली पाटीलने सोशल मिडीयावर एक पोस्ट शेयर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सोनालीने आईसोबतचा फोटो शेयर करत सोशल मिडीयावर लिहलं आहे, जी काही आहे ती तुझ्यामुळे च आहे...... अजून आठवतं जेव्हा चोरुन ऑडिशन ला जायचे कारण पप्पांना आवडायचं नाही, कोल्हापूर मधे शूट करायचे तेव्हा बिंधास पणे सांगणारी, पाठीशी उभी राहणारी, पप्पांना समजावून सांगणारी , आणि आतापर्यंतच्या प्रवासात साथ देणारी माझी मैत्रिण म्हणजे तूच. तसं मला तुला,happy friendship म्हणायला खूप आवडतं कारण तु माझी खूप जवळची मैत्रिण आहेस तुला माहितेय पण महिलांच्या प्रती भावना व्यक्त करण्याचा एकच दिवस असतो म्हणुन आज जरा मुद्दामच सगळं सांगतोय...... तर माझ्या लाडक्या "कला" ला (तिची आई माझी आज्जी तिला "कलाबाई" बोलावते) आणि मग मी आई ला चिडवते तुझं नाव हे आहे म्हणून मला तुझ्या नावाताली "कला"माझ्यात उतरली आणि ती हसते ...... तिचं नाव "माया" पण आहे बरं का आणि तेवढी मायाळु सुध्दा म्हणुन गल्लीची सगळी लहान पोरं बाळं तिला"मायाआई" च म्हणतात...... अश्या माझ्या माया आई ला आणि जगातल्या सगळया स्त्रियांना ज्यांनी परोपकराची भावना न ठेवता स्वतःचा विचार कमी करून इतरांच्या मनाचा, भावनांचा विचार करणाऱ्या स्त्रियांना " जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"
हा स्त्री प्रति प्रेम आणि आदर व्यक्त होणारा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात रोज येवो हीच प्रार्थना
टीप: तरीही मी पप्पांसारखीच दिसते 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive