By  
on  

महिलादिनी हेमांगी कवी म्हणते, खुप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं... .

आपल्या बिनधास्त आणि बेधडक व्यक्तव्यांसाठी अभिनेत्री हेमांगी कवी चर्चेत असते. ती आपलं मत ठामपणे मांडते. सोशल मिडीयावर तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा रंगते.विविध विषयांवरील मतं हेमांगी तिच्या पोस्टमधून मांडत असते. नुकतीच हेमांगीनं  जागतिक महिला दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिनं ट्रोलिंगबाबत तसेच तिच्या  'बाई, बुब्स आणि ब्रा...'  या पोस्टवर लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल लिहिले आहे. 

हेमांगीनं पोस्टमध्ये लिहिले, '2021 हे वर्ष  माझ्यासाठी महत्वाचं ठरलं! कलाकार म्हणून काही महत्वाच्या प्रोजेक्ट्समध्ये माझी वर्णी लागली जे 2022 मध्ये तुमच्या समोर येईलच पण एक बाई म्हणून जास्त महत्वाचं ठरलं!'

पुढे तिनं लिहिले, 'काही लोकांनी मला झिडकारलं, फटकारलं, खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं (आज ही ते चालूच आहे), काहींनी साथ सोडली, मैत्रीण म्हणून ही नकोच म्हणून लांब केलं, काही लोकांनी तर माझी इतर ओळख त्यांना माहीत असताना देखील 'ही तीच ना... बाई, बुब्स वाली बाई' हीच माझी एकमेव ओळख म्हणून मुद्दाम माझ्यावर लादायच काम केलं.'

एकीकडे काही लोकांनी मला झिडकारलं, फटकारलं, खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं (आज ही ते चालूच आहे), काहींनी साथ सोडली, मैत्रीण म्हणून ही नकोच म्हणून लांब केलं, काही लोकांनी तर माझी इतर ओळख त्यांना माहीत असताना देखील 'ही तीच ना... बाई, बुब्स वाली बाई' हीच माझी एकमेव ओळख म्हणून मुद्दाम माझ्यावर लादायच काम केलं, ofcourse मला माझ्या या नवीन ओळखीचा अभिमानच आहे कारण त्यामुळे का होईना बाईला जाचक ठरणाऱ्या पुरुषप्रधान मानसिकतेला (या मानसिकतेत बाई आणि पुरुष दोन्ही येतात) जोरदार हादरे बसले आणि विचार करायला भाग पाडलं तर दुसरीकडे..
काहींनी मला खूप मनापासून स्वीकारलं, काहींनी छुपा का होईना मला पाठिंबा दर्शवला, खूप छान आणि नवनवीन लोकं जोडली गेली, काही जाणत्या लोकांनी भरभरून कौतुक केलं, काहींनी आत्माविश्वास वाढवला तर काहींनी मला चक्क inspiration च मानलं! बाप रे! Rollercoster ride का काय म्हणतात ना तसलं काहीसं ठरलं हे वर्ष! पण या सगळ्या चांगल्या वाईट अनुभवातून मी बाई म्हणून आतून बाहेरून अधिकाधिक उजळत गेले. स्वतःला जास्तीत जास्त सापडत गेले. थोडक्यात happy होत गेले ️ आणि आज तोच रोजचा आनंद साजरा करण्यासाठीचा खास दिवस!
त्यासाठी मी तुम्हां सर्वांचे आजच्या जागतिक महिला दिवशी मनापासून आभार मानते आणि शुभेच्छा ही देते!

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive