By  
on  

नागराज भावा या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू 'प्रेरणा' ठरणार - किरण माने

आपले मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सिनेमा झुंड नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींनी करोनाच्या महामरी काळानंतर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. बडी फिल्म बडे पर्देपर या सिनेमाच्या टॅगलाईनप्रमाणेच हा सिनेमा सर्वार्थाने सिध्द होतोय. आमिर खान, धनुष, यासारख्या सुपरस्टार्सनंतर मराठी कलाकारांकडून झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय..

आपल्या बिनधास्त वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेले अभिनेते किरण माने हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात. आपल्या विविध पोस्टमधून ते पचाहत्यांचं लक्ष वेधतात. नुकतंच किरण माने यांनी मराठंमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या झुंड या बॉलिवूडपटासाठी केलेली पोस्ट चर्चेत आहे. 

किरण मानेंची फेसबुक पोस्ट शेअर करत लिहिले आहे,"नागराज, लै लै लै वर्ष झाली. मी खाली पोस्ट केलेली तुझी, ‘तुझ्या येण्याअगोदर एक पत्र’ ही कविता वाचून अस्वस्थ झालो होतो. आज या कवितेचं ‘महाकाव्य’ करून तू मोठ्या पडद्यावरुन मांडलंस आणि अख्खा देश हलवून सोडलास. भारतीय सिनेमाच्या दिग्दर्शन, स्क्रीनप्ले संवाद लेखनाच्या सगळ्या रूढ चौकटी मोडून-तोडून तू खूप काही बदलतोस, सगळी बंधनं झुगारून देऊन तुझ्या मनातलं काहीतरी मांडतोयस…सहजपणे… ‘बघाच आणि समजून घ्याच’ असा आग्रह न करता ! या पिढीसाठीही आणि पुढच्या अनेक पिढ्यांसाठी तू

किरण मानेंची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट शेअर करत किरण मानेंनी नागराज मंजुळे यांची एक कवितादेखील शेअर केली आहे. किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढून टाकल्यामुळे ते चर्चेत आले होते. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive