By  
on  

प्रिया बापटने सांगितलं सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य, व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रिया बापट आणि  उमेश कामत ही क्युट सेलिब्रिटी जोडी तुम्हा-आम्हा सर्वांचीच लाडकी आहे. दोघंही सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असलेले पाहायला मिळतात. आयुष्यातले अनेक अनुभव,प्रसंग ते चाहत्यांसोबत शेअर करतात. तर कधी त्यांच्यातील अवखळ मस्तीसुध्दा पाहायला मिळते. ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनसुध्दा या जोडीची अफलातून केमिस्ट्री सोशल मिडीयामुळे चाहत्यांपर्यंत पोहचते.  नुकतंच प्रियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिने सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य सांगितले आहे.

प्रियाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्हाला आमच्या सुखी वैवाहिक जीवनाचे रहस्य जाणून घ्यायचे आहे का? असा प्रश्न तिने या व्हिडीओला कॅप्शन देताना विचारला आहे. यासाठी तुम्ही रिल पाहा, असे तिने सांगितले आहे. या रिलची सुरुवात यशस्वी विवाहासाठी सर्वोत्तम गोष्ट काय? या तिच्या प्रश्नाने होते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया व्हिडीओत सांगते की,, ‘सुखी वैवाहिक जीवनासाठी दोन व्यक्तींमध्ये काही गोष्टी आवश्यक असतात. त्यातील एक व्यक्ती हा आळशी असावा आणि दुसरा व्यक्ती हा उत्साही असावा’, असे तिने या मजेशीर व्हिडीओत म्हटले आहे. या व्हिडीओत उमेशही दिसत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रिया बापटच्या या धम्माल व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive