By  
on  

अभिनेत्री प्राजक्ता माळीची आई सोबत डेझर्ट सफारी, पाहा Photos

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या अभिनयासोबतच सौंदर्य आणि अदाकारीचे असंख्य चाहते आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. तिच्या बहारदार सूत्रसंचलनाने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रंमाची रंगत वाढते. अलिकडेच प्राजक्ताचा अंकुश चौधरीसोबत लकडाऊन हा सिनेमा चाहत्यांच्या भेटीला आला होता. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणा-या प्राजक्ताने नुकतंच आईसोबत केलेल्या दुबई सफरीचे सुंदर फोटो चाहत्यांशी शेयर केले आहेत. 

प्राजक्ताने आईसोबत छान दुबई सफर केली. या सफरीचे सुंदर फोटो तिने पोस्ट केले आहेत. ती लिहते, गेली २-३ वर्ष आईला बाहेर देशात फिरायला जायचं होतं.
शूटींगमधून सुट्टी आणि उतरणीला लागलेले कोविड नियम बघून आम्ही दोघी दुबईला आलो. 

मायलेकींनी वाळवंटात भरपूर धम्माल केली. परदेश सहलीचा मनमुराद आनंद लुटला आणि धम्माल फोटोही काढले. 

चाहत्यांनी प्राजक्ता आणि तिच्या आईच्या या डेझर्ट सफारीच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive