By  
on  

म्हणून भारत गणेशपुरेंनी केला अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो शेयर

मराठमोळे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा सिनेमा झुंड नुकताच 4 मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला.या सिनेमाच्या निमित्ताने बिग बींनी करोनाच्या महामरी काळा'तर तब्बल 2 वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. बडी फिल्म बडे पर्देपर या सिनेमाच्या टॅगलाईनप्रमाणेच हा सिनेमा सर्वार्थाने सिध्द होतोय. आमिर खान, धनुष, यासारख्या सुपरस्टार्सनंतर मराठी कलाकारांकडून झुंड सिनेमावर कौतुकाचा वर्षाव होतोय. अनेक मराठमोळे सेलिब्रिटीसुध्दा सोशल मिडीयावर झुंड सिनेमाविषयी व्यक्त होत आहेत. अमिताभ बच्चन यांच्यासबोतच अनेक मराठी कलाकार सिनेमात झळकतायत. 

 ‘चला हवा येऊ द्या’फेम विनोदवीर आणि अभिनेता भारत गणेशपुरे यांनी यांनीही या चित्रपटात भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिकेचे सर्वजण कौतुक करताना दिसत आहे. नुकतंच भारत गणेशपुरे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.

अमिताभ बच्चन यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत भारत गणेशपुरे यांनी महानायकासोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. 

 

. ‘त्यांच्यासोबत काम करणे नेहमीच प्रेरणादायी असते’, असे भारत गणेशपुरे यांनी म्हटले आहे. त्यांची ही पोस्ट काही क्षणातच व्हायरल झाली आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive