By  
on  

'थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमची...', विराजस कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरचा गोड नायक म्हणून अभिनेता विराजस कुलकर्णी  प्रसिध्द आहे. सोशल मिडीयावर तो सतत सक्रीय असतो. अभिनेत्री शिवानी रांगोळे सोबतच्या नात्याची त्याने नुकतीच कबुलीही दिली. दोघांवरही चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विराजस कुलकर्णी हा व्हिक्टोरिया  या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाच्या कलाकारांचा फर्स्ट लूक समोर आला होता. नुकतंच या चित्रपटाच्या शूटींग संपले आहे. विराजस कुलकर्णीने याबाबतची पोस्ट चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

विराजस व्हिक्टोरिया सिनेमाच्या संपूर्ण टीमचा परदेशात शूटींग करतानाचा फोटो पोस्ट करत लिहतो, "“व्हिक्टोरिया चित्रपटाचे शूटींग संपले. थंडी, पाऊस आणि रक्ताच्या धारांमधून आमचा पहिला हॉरर चित्रपट, तुमच्यापर्यंत पोहोचायला एक पाऊल पुढे आला आहे!” 

 

‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटातून हीरा सोहल ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तर जीत अशोक आणि अभिनेता विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण या चित्रपटामधून करत आहेत.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive