By  
on  

मन उडू उडू झालं ! मराठी अभिनेत्रींमध्ये ह्रता दुर्गुळे ठरली इन्स्टाग्राम टॉपर, गाठला 2.4 मिलियन फ़ॉलोअर्सचा टप्पा

अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर अभिनेत्री ह्रता दुर्गुळे हिने मालिकाविश्वात आपलं मोठं स्थान निर्माण केलं, छोट्या पडद्यावरची लाडकी नायिका अशी तिची ओळख आहे. सध्या मन उडू उडू झालं या झी मराठीवरील रोमॅण्टिक व कौटुंबिक मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येते. तसंच रंगभूमीवर सध्या ह्रताची प्रमुख भूमिका असलेलं दादा एक गुड न्यूज आहे हे नाटकही खुप गाजतंय. 

ह्रता सोशल मिडीयावरही सक्रीय असते. अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेयर करते. काही महिन्यांपूर्वीच ह्रताने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेयर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतिक शहासोबत ह्रता एंगेज झाली आहे. या गोड बातमी नंतर ह्रताच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ह्रता ही मराठी अभिनेत्रींमध्ये इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्कींग साईटवरची टॉपर ठरलीय. तिने आत्तापर्यंत  2.4 मिलियन फ़ॉलोअर्सचा टप्पा ओलांडला आहे. इतके जास्त फॉलोअर्स असलेली ह्रता ही पहिली मराठी अभिनेत्री ठरलीय. 

लवकरच ह्रता रवी जाधव निर्मित  अनन्या या मराठी सिनेमांत झळकणार आहे. या सिनेमाद्वारे ती एका सामान्य मुलीची असामान्य गोष्ट मोठ्या पडद्यावर मांडणार आहे. अनन्याच्या धाडसाचा आणि जिद्दीचा हा प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन प्रताप कड यांनी केलं आहे.10 जून रोजी ह्रताचा अनन्या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive