By  
on  

मृत्यूच्या दाढेतून परतली ही मराठमोळी अभिनेत्री, पुन्हा करतेय शुटींग

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांमधील आपल्या व्यक्तिरेखेतून छाप पाडणा-या अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी पुन्हा एकदा कलाविश्वात दमदार पुनरागम केलं आहे. अनेक मालिका,सिनेमा, नाटक अशा विविध माध्यमांतून झळकणा-या   ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा काही महिन्यांपूर्वी जीवघेणा अपघात झाला होता. या गंभीर अपघातामध्ये वर्षा यांच्या पायाला दुखापत झाली होती. अपघातामध्ये त्यांच्या मणक्यालाही दुखापत झाल्यानं त्यांना उभं राहणं, चालणं शक्य होत नव्हतं. पंरतु डॉक्टरांनी दिलेल्या सल्लाप्रमाणे त्यांनी योग्य ट्रिटमेंट, सकस आहार आणि मुख्य म्हणजे सकारात्मक विचारसरणी ठेऊन या आजारावर मात केली आणि  पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला सुरुवात केलीय. 

जीवावर बेतणाऱ्या दुखापतींमधून वर्षा दांदळे आता पूर्ण बऱ्या झाल्या आहेत. इतकंच नाही तर वर्षा दांदळे पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत होत आहेत. तशा आशयाची पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.

अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी इन्स्टावर त्यांच्या आगामी सिनेमाच्या सेटवरचे काही फोटो शेअर केले आहेत. जीवावर बेतलेल्या अपघातातून पूर्णपणे झाल्यानंतर वर्षाताईंनी एकदम उत्साहानं कमबॅक केलं आहे. वर्षा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आगामी 'रानजाई' सिनेमातील काही फोटो शेअर केले आहेत. 

 

वर्षाताईंच्या या फोटोंवर व कमबॅकच्या वृत्तावर चाहते आणि सिनेविश्वातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. 

 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive