By  
on  

महाराष्ट्राचे लाडक्या आदेश भाऊजींच्या नावाचा होतोय गैरवापर, जाणून घ्या

दार उघड बये दार उघड,....आदेश पैठणी घेऊन आला, म्हणत अवघ्या महाराष्ट्रचे लाडके बनलेले आदेश भाऊजी म्हणजेच अभिनेते आदेश बांदेकर. होम मिनीस्टर या कार्यक्रमामुळे आदेश बांदेकर यांनी रसिक प्रेक्षकांच्या मनामनांत स्थान मिळवलंय. त्यांची लोकप्रियता अफाट आहे. पण नुकतंच त्यांना त्यांच्या लोकप्रियतेचा फटकासुध्दा बसलाय. म्हणूनच त्यांनी चाहत्यांना सतर्क केलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना खबरदारी घेत सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

आदेश बांदेकर यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केलीय. त्यात त्यांनी लिहलंय,  'बांदेकर हे आडनाव किंवा या आडनावाशी साधर्म्य साधणारे बरेच जण मनोरंजनाबरोबरच विविध क्षेत्रात वावरत आहेत. यापैकी कोणाशीही व्यवहार करताना काळजी घ्यावी. माझे नातेवाईक आहे असं सांगून कुणी आपली फसवणूक केल्यास त्याच्याशी माझा कोणताही संबंध नसेल. - आदेश चंद्रकांत बांदेकर'
 

 

 

दरम्यान, याआधी अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेता भरत जाधव यांना देखील असाच अनुभव आला होता. त्यानंतर त्यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून चाहत्यांना अशा फसवणूक करणाऱ्या लोकांपासून सजग राहण्याचं आवाहन केलं होतं.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive