By  
on  

अभिनेते समीर चौघुलेंची पत्नीसोबत दुबई सफर, पाहा Photos

विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे आणि अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौघुले . समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर यांनी रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे.

'फू बाई फू', कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमांमधून समीर चौघुले हे नाव घराघरांत  पोहचलं, पण आता महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या हदयात स्थान मिळवलं. 

समीर हे सोशल मिडीयावर सतत सक्रीय असतात.

महाराष्ट्राचे लाडके हास्यसम्राट समीर चौघुले हे नुकतंच आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत पत्नीसोबत दुबई सफरीला गेले होते. 

समीर चौगुले यांनी त्यांच्या दुबईतील सुट्ट्यांचे काही निवडक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

समीर आणि  त्यांच्या पत्नीने ही दुबई ट्रीप भरपूर एन्जॉय केली. ं

बहुप्रतिक्षित छोटी ट्रीप दुबईत असं छानसं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिल आहे. 

तसंच "आ" विस्फारलेल्या डोळ्यांनी बघावं असं शहर आणि "याचे इंडियन रूपीज मध्ये किती होतात !" असा विचार करत करत केलेली खरेदी.. चार दिवस सुखाचे असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे,

समीर आणि त्यांच्या पत्नीच्या दुबई सफरीचे फोटो पाहून चाहते त्यांच्यावर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव करतायत. 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive