By  
on  

हाय गर्मी! मराठमोळ्या अभिनेत्याच्या शर्टलेस फोटोवर तरुणी फिदा

मराठी सिनेसृष्टीमधला हँडसम, डॅशिंग अभिनेता म्हणून ललित प्रभाकरकला ओळखले जाते.  छोट्या पडद्यावरील जुळून येती रेशीम गाठी मालिकेतून अभिनेता ललित प्रभाकरने अल्पावधितच रसिकांची मनं जिंकली  आणि तो सर्वांचा लाडका बनला. सध्या विविध मराठी सिनेमे आणि वेबसिरीजमधून ललित प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकताच सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट करत त्याने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलंय. 

ललित प्रभाकरने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. त्यासोबत त्याने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ललित हा पाठमोरा उभा आहे. त्यासोबत तो शर्टलेस होऊन शॉवर घेत असल्याचेही दिसून येत आहे. ललितने स्वत:चा शर्टलेस फोटो शेअर त्याला हटके कॅप्शन दिले आहे. तो म्हणाला, ‘प्रश्न पोटा पाण्याचा असला तरी पाठा पाण्याला विसरून चालणार नाही’.

 

 

त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याच्या या फोटोवर चाहते कमेंट्स करताना दिसत आहेत. फक्त चाहतेच नव्हे तर अनेक मराठी कलाकाराही त्याच्या फोटोवर कमेंट करताना दिसत आहे. मृण्मयी देशपांडे, हेमंत ढोमे, निपुण धर्माधिकारी अशा अनेक कलाकारांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive