प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. सध्या प्रार्थना झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ह्या नायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतेय.
प्रार्थनाचा खुप मोठा चाहतावर्ग आहे.
ती सोशल मिडीयावरसुध्दा सतत सक्रीय असते.
विविध आऊटफिटमधले मनमोहक फोटो ती चाहत्यांशी शेअर करते.
नुकतंच प्रार्थनाने एक हटके आणि बोल्ड फोटोशूट करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
कार्टून प्रिंटच्या या खास ड्रेसमध्ये प्रार्थना खुपच स्टनिंग दिसतेय.
प्रार्थनाच्या या लुकवर चाहते एकदम खुश झाले आहेत.