By  
on  

परी फेम मायरा वायकुळच्या घरी आली नवी इलेक्ट्रिक कार

 माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या फ्रेश जोडीसह गोड चिमुकली मायरा वायकुळ रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. नेहा कामतची लेक परी म्हणून मालिकेत तिची खुप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

सर्वांच्या  लाडक्या परी फेम मायराच्या घरी एक नवीन गाडी आली आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मायरा आणि गाडीचे हे फोटो तिच्या आईने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मायराचे आई – वडील श्वेता आणि गौरव वायकुळ यांनी नुकतीच एक इलेक्ट्रॉनिक कार खरेदी केलीय. हे फोटो शेअर करत मायराच्या आईने ‘१ जून १९६० हा नंबर नेहमी आम्हाला खूप कष्ट करण्याचा उत्साह देईल. मिस यु पापा’, असे कॅप्शन दिले आहे. मायराचा स्टाइलिश लूक या व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये दिसत आहे. या गाडीची किंमत १७ लाख रुपयांच्या जवळपास आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive