By  
on  

आर्या आंबेकर म्हणते, 'लहान तोंडी मोठा घास.....'

लोभस चेहरा आणि गोड आवाज यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेली गायिका म्हणजे आर्या आंबेकर. अनेक सिनेमांची गाणी, मालिकांची शिर्षकगीतं यामधून रसिकांच्या मनावर जादू करते.  ‘ती सध्या काय करते’ या सिनेमातूनही तिने  आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अलिकडेच सारेगमप लिटील चॅम्प्स या कार्यक्रमाच्या परिक्षकपदीही आर्या विराजमान होती.यात तिच्या मार्गदर्शनासोबतच तिचे गोड लुक्स पाहण्याची पर्वणी चाहत्ययांना मिळाली. 

सोशल मिडीयावर आर्या सतत सक्रीय असते. तिची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आर्याने नुकतीच एक पोस्ट शेयर केलीय . यात तिचा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी आ वासला आहे. ही तिची पोस्ट बरीच चर्चेत आहे. 

आर्या आंबेकरने एक योगप्रकार करतानाचा व्हिडीओ अपलोड केला आहे. यावर चाहते कौतुकाचा वर्षाव करतायत. 

 

 

हा व्हिडीओ शेयर करत आर्या म्हणते, Being a beginner at working out, this is लहान तोंडी खूपच मोठा घास . तसंच आर्या पुढे सांगते हा योगप्रकार करताना काळजी घ्या. तुमच्या पाठीची काळजी घ्या नाहीतर उगाच माझ्यासारखं होईल. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive