By  
on  

अक्षय कुमारने केलं मराठमोळ्या अभिनेत्रीचं कौतुक, व्हिडीओ पाहिलात का?

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो. विशेष म्हणजे या कार्यक्रमातील विनोदवीरांच्या टीममधील कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे ही सगळ्यांची आवडती आहे. तिची नकला करण्याची शैली, विनोदाचं उत्तम टायमिंग यामुळे श्रेया महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. 

ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच श्रेयाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ आणि तिची पोस्ट खुप व्हायरल तर होतेच आहे, पण तिच्यावर कौतुकाचा वर्षावही होतोय. 

श्रेया बुगडे हिने शेअर केलेला हा व्हिडीओ चला हवा येऊ द्या च्या मंचावरील आहे. या व्हिडीओत तिच्यासोबत अक्षय कुमार दिसत आहे. हा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारने या कार्यक्रमात हजेरी लावली त्या दरम्यानचा आहे. या व्हिडीओत अक्षय कुमार हा श्रेया बुगडेच्या कॉमेडीचे, तिच्या अभिनयाचे तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहे. “तू फार म्हणजे फार टॅलेंटेड आहे. तुझ्यात विशेष कौशल्य आहेत. आम्हा सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी तुझे फार फार आभार”, असे अक्षय कुमार हा श्रेया बुगडेला बोलताना दिसत आहे.  हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive