By  
on  

पाहा Video : जेव्हा सईने पहिल्यांदा मराठी सिनेमात बिकीनी परिधान केली होती...

मराठी सिनेसृष्टीची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस लुक कॅरी करण्यात ही फॅशनिस्टा नेहमीच पुढे असते. मराठीसोबतच आता सईने बॉलिवूडमध्येही आपलं स्थान निर्माण केलं आहे. अनेक बॉलिवूडपटांमधून सई लक्षवेधी भूमिकांमध्ये पाहायला मिळते. अलिकडेच सईने सोशल  मिडीयावर एक व्हिडीओ शेयर केला आहे. ज्यात ती एका वेबसाईटला मुलाखत देताना आपल्याला आलेला एक अनुभव शेयर करतेय, सईने जेव्हा मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदा बिकीनी घातली होती तेव्हा तिला कोणत्या प्रसंगांना सामोर जावं लागलं याबद्दल तिने खुलासा केला आहे. 

.सईने ‘नो एण्ट्री पुढे धोका आहे’ चित्रपटात बिकिनी परिधान करत मराठी चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली होती. “जेव्हा मी बिकिनी परिधान केली, तेव्हा आश्चर्याची गोष्ट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीने मोकळ्या मनाने माझं स्वागत केलं. पण असं जरी असलं तरी थोड्याप्रमाणात माझ्यावर टीकाही झाली.

पुढे चित्रपटांविषयी बोलताना सई म्हणाली, “मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात. ‘हंटर’नंतर मला त्या पद्धतीच्याच भूमिका येत होत्या. पण तीन वर्षानंतर लव्ह सोनिया चित्रपट मिळाला. यातील भूमिका वेगळी होती म्हणून मी तो चित्रपट केला.”

क्रिती सेनॉनबरोबर मिमी हा सिनेमा केल्यानंतर आता सई आशुतोष गोवारिकर यांच्या इंडिया लॉकडाऊन या महत्त्वकांक्षी सिनेमात झळकतेय. तसंच अनेक मराठी सिनेमांचचे तिचे प्रोजेक्टही प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. 

 

 

Source : Pinkvilla 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive