छत्रपती शिवाजी महारांज म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत. मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर सोशल मीडियावर सातत्यानं चर्चेत आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटात चिन्मयनं ‘बिट्टा ’ ही भूमिका साकारली आहे. हा सिनेमा अनेक कारणांनी चर्चेत आहे. वादाचा मुद्दा ठरतोय. विशेष म्हणजे त्याआधी ‘पावनखिंड’ तो ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या भूमिकेत दिसला होता. या दोन्ही भूमिकांबाबत एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला. पण त्यावेळी असं काही घडलं की चिन्मयच्या एका कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमात बिट्टाची भूमिका साकारणा-या चिन्मयची एका वाहिनीवर मुलाखत सुरु होती. त्यादरम्यान चिन्मयनं अतिशय अभिमानास्पद कृत्य केल्याचं पाहायला मिळाल. मुलाखत घेणाऱ्या अँकरने चिन्मयचा परिचय देण्यास सुरुवात केली. यावेळी त्या अँकरने छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख शिवाजी असा केला. यावर चिन्मयने त्याला थांबवत छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख करावा असे फार प्रेमळ शब्दात सांगितले. त्यावेळी त्याचे महाराजांबद्दल असलेले प्रेम पाहून चाहते भारावून गेले. नुकतंच याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटात चिन्मय मांडलेकरनं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.