By  
on  

मैं भी गुलाबी तू है गुलाबी..म्हणत लक्ष्याच्या लाडक्या लेकीचं सुंदर फोटोशूट

बाबा लक्ष्मिकांत बेर्डे ,आई प्रिया बेर्डे आणि भाऊ अभिनय बेर्डे यांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वानंदी बेर्डेसुध्दा आता मराठी कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करतेय, सोशल मिडीयावरुन स्वानंदी सतत चाहत्यांशी संपर्कात असते. आत्तासुध्दा स्वानंदीने गुलाबी साडीतले  काही मनमोहक फोटो चाहत्यांशी शेअर करत लक्षवेधून घेतलं आहे. 

गुलाबी साडीतला स्वानंदीचा अंदाज घायाळ करणारा आहे. 

स्वानंदी या खास फोटोशूटला कॅप्शन देत म्हणते, मैं भी गुलाबी..तू है गुलाबी...दिन भी गुलाबी है गुलाबी ये कहर.

तिच्या या फोटोवर लाइक्स व कमेंट्सचा चाहत्यांकडून वर्षाव होत आहे. 

स्वानंदीने धनंजय माने इथेच रहातात का..या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं. या नाटकाला रसिकांची चांगलीच दाद मिळतेय.

स्वानंदी लवकरच सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. ती किशोर बेळेकर यांच्या ‘रिस्पेक्ट’ सिनेमातून पदार्पण करते आहे.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive